top of page
Search
  • Ayushman Bhava Ayurveda

Post Covid Symptoms : Ayurvedic Treatment is better


कोरोना बरा झाल्यानंतर च्या लक्षणांवर आयुर्वेद उपचार आहे अधिक प्रभावी

- Dr.Yogesh Chavan,MD(Ayurveda)


Post Covid Symptoms Ayurvedic Treatment online


कोविड -19 विषाणूचासंसर्ग झाल्यानंतर बरेच लोक Quarantine कालावधीतून मुक्तहोत आहेत. हाविषाणूची लागण झालेल्याप्रत्येक व्यक्तीसाठी आणि तिच्याकुटुंबासाठी हा कठीणकालावधी आहे. Quarantine कालावधी दरम्यान अनेक शारिरिक, मानसिक अडचनी येतात व त्यावर देखिल मात करुन कोरोना आजारावर विजय मिळवला जातो. परंतु घरीकोविडनंतरची काळजी घेणे देखीलतितकेच महत्वाचे आहे. कारण खुप व्यक्तींसाठी कोविड बरा झाल्यानंतर बर्‍याच शारिरीक व मानसिक तक्रारींना सामोरे जावे लागते.


कोविड बरा झाल्यावरही तसेच कोविड -१९ ची आर टी पी सी आर चाचणीनिगेटिव्ह आल्यानंतरदेखिल बर्‍याचरूग्णांना दीर्घकाळापर्यंत आणि तीव्रस्वरूपाचा त्रास होऊ शकतो. त्यापैकी काही लक्षने खालिलप्रमाणे आहेत:

( Post Covid Symptoms)


- सततथकवा किंवा थोड काम केले तरी तीव्र थकवा (Constant body fatigue or Chronic Fatigue Syndrome)


- धाप लागणे, थोड काम केले तरी दम लागणे (Breathlessness, Dyspnea on exertion)


- झोपेचीविकृती- अनिद्रा किंवा बेचैनी ( Insomnia, Restlessness)


- म्युकरमायकोसिस – Mucormycosis


- औदासिन्यआणि चिंता (Depression, Anxiety)


- डिफ्यूजमायल्जिया- मांसपेशी सतत दुखत राहणे (Diffuse myalgia – Bodyache)


- गोंधळ होणे (Confusion), लक्ष केंद्रीत करताना अडचनी, छोट्या गोष्टी विसरणे इत्यादी काहीसंज्ञानात्मक लक्षणे.

- स्नायू आणि सांधे दुखी


जर योग्य काळजी घेतलीनाही तर काहि व्यक्तींमधे फुफ्फुसांचे नुकसान, हृदयाचीहानी इत्यादीसारख्या गंभीरपरिस्थिती विकसित होऊ शकतात.


रोगप्रतिकारशक्तीचे विकार (immune disorders), मधुमेह, उच्च रक्तदाबइत्यादींसारख्या आरोग्याच्या परिस्थितीचा इतिहासअसलेल्या लोकांना कोव्हिड -१९ नंतरच्याcytokine storm नावाच्या आरोग्याच्या परिस्थितीचाधोका जास्त असतो.


cytokine storm म्हणजे जेव्हा रोगप्रतिकारक प्रतिक्रिया जास्त प्रमाणात उद्दिपित होते तेव्हा सायटोकीनप्रथिने वेगवान वेगाने रक्तामध्ये जास्तप्रमाणात सोडली जातात.

ही प्रतिकारशक्ती प्रतिक्रिया; तापमानातील विकृती, झोपेची विकृती, संज्ञानात्मक विकृती आणि तीव्रथकवा यासारख्या असंख्यलक्षणांसाठी कारणीभुत असते. अशी स्थीती आधीच इतर आजार असलेल्या लोकांसाठी गंभीरअसू शकते.


घरी पोस्ट कोविड -१९ व्यवस्थापनासाठीआरोग्य मार्गदर्शक तत्वे कोणतीआहेत?


आरोग्य मंत्री हर्षवर्धनआणि आयुष मंत्रीश्रीपाद नाईक यांनीतयार केलेल्या आयुर्वेदआणि योगावर आधारितकोविड -१९ च्या राष्ट्रीय क्लिनिकल मॅनेजमेंटप्रोटोकॉलनुसार उच्च जोखीमप्रवर्गात आणि थेटसंपर्क असलेल्या लोकांमध्ये हाआजार रोखण्यासाठी काहीमहत्त्वाचे विशिष्ट उपाय सुचवलेगेले होते. .