
Ayushman Bhava Ayurveda
पिम्पल्स / तारुण्य पिटीका : आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे अधिक प्रभावी

पिम्पल्स साठी योग्य उपचाराच्या शोधात सर्वच तरुण/तरुणी असतात व आयुर्वेद उपचार तुम्हाला अतिशय योग्य रीसल्ट मिळवुन देतो. पिंपल्स तारुण्य पिटीका या त्वचा विकाराला तारुण्याला मिळालेला शाप म्हटले जाते कारण १३ ते २६ वयोगटातील ५० ते ६० % तरुण/ तरुणी या त्वचा विकाराने त्रस्त आहेत. या मुळे पर्सनॅलीटी मधे कमतरता वाटतेच सोबत कॉन्फीडंस सुद्धा कमी होतो म्हणुनच हा विकार तरुणांना शारीरीक व मानसीक कष्ट देतो.
टीव्ही शो, चित्रपट, सौंदर्य स्पर्धा यामुळे सतेज व नितळ त्वचा व सुंदर दिसण्याच गोड स्वप्न सर्व तरुणाईच्या विशेषकरुन तरुणींच्या मनात असते, पण बर्याच जणांसाठी हे दुरचे व पुर्ण न होणारे स्वप्न ठरते. या त्वचा विकारास प्रमुख कारण असते या वयातील उधानलेली हार्मोन्स, उत्कट झालेले कफ-वात-रक्त दोष व चुकीचा आहार- विहार.

या त्वचा विकारात चेहर्यावर वेदनायुक्त कींवा वेदनारहीत मुरुम व पुटकुळ्या उत्पन्न होतात, या काही व्यक्तींमध्ये सौम्य तर काहींमध्ये तीव्र स्वरुपाच्या असतात. साधारणत: १३ ते २६ या वयोगटातील तरुणाई या विकाराने जास्त प्रभावीत असल्याने यास तारुण्यपिटीका किंवा मुखदुषिका असे म्हटले जाते.
तारुण्यात उत्कट असलेल्या हार्मोन्स व कफ इ.दोषांमुळे चेहर्यावरील त्वचेतील तैलग्रंथी(Sebaceous glands) व स्वेदग्रंथींमध्ये जास्त प्रमाणात तैलयुक्त स्त्राव तयार होतो व त्वचा तेलकट पडते हा स्त्राव दिवसेंदिवस वाढतच राहतो व या कालावधीत केलेल्या चुकीच्या आहार विहारामुळे अधिकच घट्ट होत जातो व तेथे(Sebaceous glands) जीवाणुंच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण तयार होते. वाढलेले जीवाणु हे त्या ग्रंथीचा आकार वाढवुन त्याचे मुख(Pilosebaceous duct) बंद करतात व परिणामी चेहर्यावर मुरुम पुटकुळ्या उत्पन्न होतात.
तारुण्यपिटीका वाढवण्यात आहारासोबतच कॉस्मेटीक्स,वातावरण, मानसिक तणाव, मलावष्टंभ व ऋतुमान देखिल कारणीभुत असतात. तसेच पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना तारुण्यपिटीका जास्त भेडसावतात.
"शाल्मलीकण्टकप्रख्या: कफमारुतशोणितै:।
जायन्ते पिडका युनां वक्त्रे या मुखदुषिका:॥&quo