top of page
Search
  • Ayushman Bhava Ayurveda

७ लोकप्रिय वजन कमी करण्याचे आहार ( 7 Famous Weight Loss Diet in Marathi)

७ लोकप्रिय वजन कमी करण्याचे आहार

7 Famous Weight Loss Diet in Marathi

- Dr.Yogesh Chavan, MD(Ayu)


Weight loss diet in Nashik

वजन कमी करण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार होतात, वेगवेगळे डायट, झुंबा, एरोबिक्स, जिम, कार्डिओ; परंतु यातील फार थोड्या व्यक्ती वजन कमी करण्यात यशस्वी होतात. चुकिचा सल्ला, मोटिवेशन चा व योग्य मार्गदर्शनाचा अभाव असे अनेक कारणे त्यासाठी आहेत. जे वजन कमी करण्यात यशस्वी होतात त्यातील ५० % लोकांचे वजन हे डायट व व्यायाम कमी केल्यावर पुन्हा वाढु लागते व खुपच कमी व्यक्तिंचे हेल्थी वेट लॉस होते.


हेल्थी वेट लॉस म्हणजे कुठल्याही दुष्परीणामांशिवाय व पुन्हा न वाढणारा असा वेट लॉस. वजन कमी करण्याची त्रिसुत्री म्हणजे योग्य आहार, व्यायाम व चयापचय प्रक्रिया योग्य करण्यासाठी हर्बल औषधी. यासाठी मार्गदर्शनासोबत मोटिवेशन ची खुप आवश्यकता असते.

वजन कमी करण्यात आहाराचा खुप मोठा रोल आहे.


वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या आहार पद्धती अस्तित्वात आहेत. परंतु व्यक्तीनुसार याचे फायदे बदलत असतात. तुम्हाला कुठली आहार पद्धती योग्य व फायदेशीर ठरेल हे योग्य तज्ञाच्या मार्गदर्शनाने ठरवुन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावी.


काही व्यक्ती आपली भूक कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात तर काही लोक कॅलरी, कार्ब किंवा चरबी प्रतिबंधित आहारचे सेवन करतात.

यात सर्वांनीच आपली आहार पद्धती श्रेष्ठ असल्याचा दावा केल्याने, कुणी कोणती आहार पद्धती अवलंबावी हे जाणून घेणे कठीण आहे.

खरे पाहिले तर कोणताही आहार प्रत्येकासाठी सर्वोत्तम नाही. एखादी आहार पद्धती तुमच्यासाठी चांगली ठरु शकते परंतु ती दुसर्‍यासाठी उपयुक्त ठरेलच असे नाही.

या लेखात ७ सर्वात लोकप्रिय वजन कमी करण्याच्या आहार पद्धती आणि त्यामागील विज्ञानाचे पुनरावलोकन केले आहे.


1. पॅलिओ आहार (Paleo Diet)

Paleo diet- weight loss diet

पॅलिओ आहार पद्धती असे सांगते की आपला आहार हा शेतीतंत्र विकसित होण्यापुर्वीचा आदिमानवाप्रमाणे असावा. यात असे सांगितले जाते कि तुमचा आहार हा कुठलीही प्रक्रिया न केलेला, शेतीमध्ये न उगवलेला कच्चा असावा.

या मागील सिद्धांत असा आहे की बहुतेक आधुनिक रोगांचे कारण हे पाश्चात्य आहार, जंक/ फास्ट फुड, धान्य, डेअरी प्रॉडक्ट आणि प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ आहेत. या आहारात प्रयुक्त पदार्थ हे खरेच आदि मानव किंवा शेती तंत्र विकसीत होण्यापुर्वीच्या मानवाने खाल्लेल्या आहाराप्रमाणेच आहे यात काहि शंकाच आहेत, परंतु ही आहार पद्धती अनेक रोगांमधे प्रभावीपणे काम करते.

हि आहार पद्धती कसे कार्य करते: (How Paleo Diet Works) :

पॅलिओ आहार हा प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, डेअरी प्रॉडक्ट आणि धान्य हे सर्व वर्ज्य करुन संपूर्ण अन्न पातळ प्रथिने, नैसर्गिक उगवलेल्या पालेभज्या, फळ भाज्या, कंदमुळे, फळे, शेंगदाणे आणि बियाण्यांवर जोर देतो.

पॅलिओ डाएटच्या आणखी काही लवचिक आवृत्त्या पनीर आणि बटर सारख्या दुग्धज