
Ayushman Bhava Ayurveda
Ayurvedic Treatment for Hair fall

केस गळताहेत... वेळीच सावध व्हा.
(Ayurvedic Treatment for Hair fall in Nashik)
२१ वर्षांची केतकी जेव्हा क्लिनिकमधे आली तेव्हा ती रडुन रडुन आपल्या केसांच्या समस्या सांगु लागली, तीचा आत्मविश्वास सुद्धा यामुळे डळमळीत झाला होता. अयोग्य आहार, केसांची निगा न घेणे, जंक फुड/फास्ट फुड चा अतिरेक, तणाव, अपुरी झोप या सर्व कारणांनी तीचे केस अति प्रमाणात गळत होते व उरलेले केस देखिल रुक्ष, निस्तेज दिसत होते. संपुर्ण हिस्टरी व केस समजुन घेतल्या नंतर मी तीला आश्वस्त केलं. शिरोधारा सारखे काहि पंचकर्म व आयुर्वेदिक औषधींचा वापर करुन ३ महिन्यात तीचे केस गळणे थांबलेच, केस बळकट व चमकदार दिसु लागले. हसत हसत थँक्यु म्हणत ती क्लिनिक मधुन गेली व पुढच्या आठवड्यात तीच्या मैत्रीनीला ट्रीटमेंट साठी घेउन आली.
