top of page
Search
  • Writer's pictureAyushman Bhava Ayurveda

Ayurvedic Treatment for Hyperacidity, GERD, Reflux in Marathi

अम्लपित्त/ हायपर-ऍसिडिटी व आयुर्वेद


Reflux/ Acidity ayurvedic treatment in Nashik


आजकालच्या धकाधकीच्या यांत्रिक युगातआहार व त्याच्याशी निगडीत बाबींकडे लक्षदेण्यास कुणाकडेच वेळनाही. जेवणाच्या वेळानियमित नसणे,रात्री जागरण, शिळे-प्रीजर्व केलेले खाद्य पदार्थ, जंकफुड-फास्ट-फुड यांचेसर्रास सेवन इ. अनेकबाबी जीवनातील रोजच्या सवयी बनुन गेल्या आहेत. या सर्वसवयी सुरुवातील त्रासदेत नाहीत परंतुत्याची परिणती हळु-हळुअनेक रोगांची पार्श्वभुमी तयार होण्यात होते. WHO नुसार जगातील ४० ते ४५% लोक कुठल्या ना कुठल्या पोटाच्या विकाराणे ग्रस्त आहेत.

अम्लपित्त (Hyperacidity) हा देखिल पचनाच्या विकारांपैकी एक आजार होय. उष्ण आहारामुळे किंवा इतर कारणांमुळे जठरातील हायड्रोक्लोरीक अम्ल व पेप्सिन या घटकांचे प्रमाण वाढते व अम्लपित्त या आजाराची लक्षणे शरीरावर दिसु लागतात.


रोजझिंटॅक/ पॅन २०-४०/ ओमेप्रॅझोल घेणारे अनेक लोकआपल्याला मित्रांमध्ये, नातलगांमध्ये किंवाशेजारयांमध्ये दिसुनयेतात. अशा ऍन्टॅसिड टॅब्लेट घेणे काहीव्यक्तींची रोजचीसवय बनुन जाते. हाकाही भयंकर आजारनाहिये परंतु दैनंदीन जीवन विस्कळीत करण्यासाठी नक्किच कारणीभुत ठरुशकतो. विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये याआजाराची लक्षणे जास्तप्रखरपणे दिसुनयेतात. पित्तप्रकोपाचा कालावधी शरद ऋतु असला तरी काही व्यक्तिंना अम्लपित्ताचा त्रास उन्हाळ्यातच प्रामुख्याने होतो. यासाठी वाढलेले तापमान, उन्हाळ्यात सेवन केली जानारी अंबट फळे ( संत्री, कैरी, लिंबु, चिंच, अंबट द्राक्षे), मद्यपान इ. बरेच कारणे आहेत.


अम्लपित्त लक्षणे - ( Symptoms of GERD, Hyperacidity in Marathi)


- छातीत व पोटातजळजळ होणे, क्वचित वेदनादेखिल होणे

- घशाशी जळजळ व अंबटपाणी येणे, करपट ढेकरयेणॆ

- मळमळ किंवा उलटीहोणे ( विशेशत: सकाळच्या वेळी)

- पोट फुगुन येणे, भुकन लागणे

- डोके दुखुन येने, हृदयव पोटाच्या ठिकाणी वेदना होणे


Also Read: Searching for Hair fall treatment: Ayurveda can guide you better
acidity diet

कारणे- ( Causes Of Hyperacidity/ reflux in marathi)

- अंबट, खारट व तिखटपदार्थांचे अतिसेवन

- गरम मसाल्याचे पदार्थ, मांसाहार, मासे, लोणचे, दही, तुरदाळ यांचे वारंवार सेवन

- शीळे व तळलेले तसेच फास्ट फुड- जंकफुड सेवन

- जेवनाच्या अनियमित वेळा, विरुद्ध आहारपदार्थांचे सेवन ( जसे- दुध+फळे)

- मद्यपान, उन्हात जास्तफिरणे, चिंता-शोक- क्रोध करणे,

- चहा- कॉफी, स्मोकिंग, रात्री जागरणव वेदनाशामक औषधांचा अतिवापर

ही कारणे प्रामुख्याणे अम्लपित्तासाठी कारणीभुत आहेत.

हा आजारगंभीर आजार नसलातरिही या आजारात ज्यांचे वजन कमीहोत चालले आहे, भुकअतिशय मंदावली आहे, वय५० च्या पुढेआहे अशा रुग्णांनी लवकरात लवकर उपचारसुरु करावेत.


Best Ayurvedic Doctor for Acidity treatment in Nashik

उपचार- (Ayurvedic Treatment of Hyperacidity, gastritis, GERD in marathi)

आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार यावर H2 ऍन्टॅगोनिस्ट eg.Ranitidine व प्रोटॉन पंप इंहिबीटर (omeprazole, Pantaprazole etc.) अशाप्रकारची औषधेप्रामुख्याने वपरलीजातात. परंतु अशीऔषधे फक्त लाक्षणिक परिणाम घडवुन आणतात.

आयुर्वेदानुसार ३ टप्प्यांमध्ये याची चिकित्सा केलीजाते.

प्रथम ज्यामुळे आजार झाला आहेव वाढत आहेअशी सर्व कारणेटाळणे गरजेचे असतेयालाच निदान परिवर्जन असे म्हणतात. यानंतर शरीरव कोष्ठात वाढलेले पित्त शरीराबाहेर काढण्यासाठी काही औषधी व विरेचन, बस्ती, वमनइ. पंचकर्मांचा समावेश होतो. अंतिम टप्प्यात उरलेल्या पित्ताचे शमन करण्यासाठी काहीआयुर्वेदिक औषधीवापरल्या जातात.


सोबतच योग्यपथ्य पाळणे, व्यायाम, मेडिटेशन करणेहे देखिल गरजेचे असते.

अम्लपित्त ज्यामुळे वाढते अशी सर्वआहार पदार्थ अपथ्यकर असतात. जसे-

( Diet restrictions for Hyperacidity/ gastritis/ GERD in Marathi)

- लोणचे, पापड, खारट, अंबट पदार्थ, मेथीव मेथीची भाजी, धुम्रपान, मद्यपान, मानसिक तणाव, खुप चिंताकरणे, वेदनाशामक औषधी, चहा- कॉफीचे अतिसेवन, शीळे अन्नखाणे

अशा रुग्नांनी खालील पथ्य पाळल्यास फायादा दिसुन येतो.

-१ वर्ष जुणेधान्य/ तांदुळ,मुग डाळ,मसुरडाळ, गायीचे दुध-तुपयांचे आहारात प्रमाण वाढवावे.

-तसेच नियमित वेळेवर आहार घ्यावा.

-कडु भाज्या व पदार्थांचे सेवन करने, कारले- डांगर यांसारख्या फळ्भाज्या सेवनकरणे

-दाळिंब,आवळा,शर्करा यांचेआहारात सेवन करणे

* योग्यआयुर्वेदिक उपचारव पथ्य यांमुळे हा आजार लवकरचसमुळ नाहीसा होतो. तरमग आयुष्यभर ऍन्टॅसिड च्या गोळ्या खाण्यात काय अर्थ?


-- डॉ.योगेश शिवाजी चव्हाण, एम.डी.(आयु.) केरळ

www.ayurvedanashik.com

Visit link to book Appointment/ Video Consultation


bottom of page