top of page
Search
  • Ayushman Bhava Ayurveda

शरद ऋतुचर्या व विरेचन (Virechan Panchakarma- Pitta Detoxification)


virechana Panchakarma treatment nashik
virechana treatment nashik

शरद ऋतुचर्या व विरेचन (Virechan Panchakarma- Pitta Detoxification in Marathi)

{ Best panchakarma for Pitta Diseases }

वर्षा ऋतुचा जोर हळु हळु कमी होत आहे व शरद ऋतु चे आगमन केव्हाच झाले आहे. वर्षा ऋतुच्या थंड व आर्द्र वातवरणापेक्षा विपरीत असलेला दिवसा कडक उन व रात्री शीतल असा हा शरद ऋतु. अश्विन व कार्तिक या दोन महिन्यांमधे(Mid September to Mid November) येणारा हा ऋतु कित्येकांना सुखद वाटतो तर काहींना उन्हामुळे नको नकोसा होतो. यालाच आपण हल्ली October heat म्हणतो. कवी कालिदास तसेच तुलसीदासांनी या ऋतु चे अगदी सुंदर वर्णन केले आहे. वर्षा संपत आल्यानंतर हीरवीगार नववधु प्रमाणे सजलेली सृष्टी, तलावांत उमललेले कमळ, हंसांचा कलरव व रात्री शरदाचं चादणं हे सर्वच मनमोहक असते.

असे असुनही पित्त प्रकृती च्या व्यक्ती तसेच इतर पित्ताचा त्रास असलेल्यांसाठी हा काळ कठीण ठरतो. कारण आधीच्या वर्षा ऋतुच्या दरम्यान शरीरात संचीत झालेले पित्त शरदात वाढलेल्या उष्णतेने प्रकुपित होउ लागते. अशा पद्धतीने प्रकुपित झालेले पित्त शरीरात अनेक पित्ताच्या आजारांना जसे अम्लपित्त, त्वचा विकार, पोटाचे विकार, शरीराची व हात-पायांची जळ-जळ होणे, अनिद्रा, तोंड येणे (Stomatitis) इत्यादींना कारणीभुत ठरते.

आयुर्वेदाने स्वस्थ व्यक्तीच्या आरोग्य रक्षणास रोग चिकित्से इतकेच कींबहुना त्यापेक्षा जास्त महत्व दिले आहे या साठी आयुर्वेदात दिनचर्या व ऋतुचर्या यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. ऋतुनुसार व्यक्तिने आपली जीवनशैली बदलली तर कुठलाही आजार होण्याची शक्यता अतिशय कमी असते. शरद ऋतुचे स्वस्थ शरीरावर होणारे परीणाम सांगुन आयुर्वेद आचार्यांनी त्यासाठी खालील उपाय सुचवलेले आहेत.

आहार- ( Diet during Sharad Ritu)

- या ऋतुमधे व्यक्तीने कषाय (तुरट), मधुर आणि तिक्त(कडु) या चवीच्या पदार्थांचा उपयोग जास्त करावा. या तीनही चवीचे पदार्थ पित्त शामक असल्याने या ऋतुत वाढलेल्या पित्ताला ते कमी करतात.


- तसेच या ऋतुमधे जाठराग्नी मंद असल्याने पाचन शक्ती कमी असते त्यामुळे पचन्यास जड पदार्थ सेवन करणे टाळावे.


- शाळीचा भात, साठी साळीचा तांदूळ, गहु, यव, मूग यांसारख्या पचन्यास हलक्या पदार्थांचा वापर वाढवावा.


- व्यक्तीने मध, पडवल, गोड पदार्थ, आवळा व मनुके, द्राक्षे यांचा आहारात वापर वाढवावा.


- नवीन तांदुळाचा भात, दही, तेल आणि मद्य (अल्कोहोल) यांचा वापर शक्य तेवढा कमी करावा.

ayurvedic treatment panchakarma nashik
Dr.Yogesh Chavan, MD Ayurveda, Nashik

विहार - (Regimen in Sharad ritu)

- थेट सूर्यप्रकाशात बसणे किंवा फिरणे शक्य तेवढे टाळावे तसेच पूर्व दिशेकडुन येनारा वारा या दरम्यान रोगट असल्याने असा वारा अंगावर घेणे टाळावे.


-दिवसा घेतलेली