top of page
Search
  • Ayushman Bhava Ayurveda

Migraine Ayurvedic Treatment & Tips in Marathi

माइग्रेन व आयुर्वेद ( Migraine & Ayurveda)

-- डॉ.योगेशशिवाजी चव्हाण, एम.डी.(आयु.) केरळ.


Migraine Ayurvedic Treatment in Nashik


आजकालच्याधकाधकीच्या व धावपळीच्यायुगात दैनंदिन जीवनातखुप सार्‍या डोकेदुखीकिंवा ताणतणाव भेडसवत असतातत्यातच भर म्हणुनकाही व्यक्तींच्या जीवनातमाइग्रेन नावाच्या डोकेदुखीचा भस्मासुरडोके वर काढुनउभा राहतो वअशी व्यक्ती सर्वबाजुंनी घेरली जाते. आधुनिकवैद्यकशास्त्रात या आजारावरपुरेसे उपाय नसल्यानेती व्यक्ती अजुनचअसहाय बनते. परंतुआयुर्वेद शास्त्राच्या मदतीने या माइग्रेननावाच्या भस्मासुराचा नक्कीच पराभव करतायेउ शकतो.


आयुर्वेद ग्रंथांमधे ११ प्रकारच्या शिरशुलाचे वर्णन व सविस्तर चिकित्सा सांगीतली आहे. अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या शिरशुलाचे american headache society ने प्राथमिक(Primary) व द्वितीयक (secondary-म्हणजेच इतर आजारांमुळे लक्षणस्वरुप दिसणारी डोकेदुखी) असे दोन प्रकारात वर्णन केले आहे. प्राथमिक शिरशुल देखिल जास्तवेळा माइग्रेन, क्लस्टर-डोकेदुखी व टेंशन-डोकेदुखी इ. कारणांमुळे होतो.

Ayurveda treatment

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) जगातील ६ ते८% पुरुष व१२ ते १५% महीला या आजाराने ग्रस्त आहेत. वारंवार होनारी डोकेदुखी ही बर्‍याचदा दुर्लक्षामुळे किंवा चुकीच्या निदानामुळे वर्षानुवर्षे तशीच राहते, अशी डोकेदुखी माइग्रेन असन्याची दाट शक्यता असते व फक्त तात्पुरते वेदनाशामक औषधे घेतल्याने हा आजार अजुनच जुनाट व असाध्य होत जातो.


आयुर्वेदामध्ये या आजाराला अर्धावभेदकअसे म्हटले जातेव हा प्रामुख्यानेवात- पित्त यांचा शिरोभागी प्रकोप

झाल्याने होतो. आधुनिक वैद्यका नुसार हाआजार होन्याचे कारण स्पष्ट नाहीत, परंतु आयुर्वेद संहीता ग्रंथांनुसार खुप काळ धुरात राहणे, उन्हात खुप फिरणे, रात्री जागरण, मानसिक तणाव वचिंता, नैसर्गीक वेगांचा अवरोध व जास्त मद्यपान करणे अशा कारणांमुळे होऊ शकतो.


(What is Migraine in Marathi)

माईग्रेन हा आजारअटॅक स्वरुपात येतोव तो खुपसार्‍या लक्षणांचा समुह असुनत्यातील बरीचशी लक्षणे ही माइग्रेन चा शरीरातअटॅक आल्यावर दिसुन येतात. या अटॅकचा कालावधी हा४ तासांपासुन ७२तासांपर्यंतचा असु शकतो. या दरम्यान दिसणार्‍या लक्षणांमध्ये डोके दुखणे हे प्रमुख लक्षण दिसते परंतु१५ ते २०% माइग्रेन च्या रुग्नांमध्ये डोकेदुखी हे लक्षण दिसत नाही व फक्त इतर लक्षणे दिसतात.

या आजारात वेदना इतक्या प्रचंड प्रमाणात असतात की कुणी डोक्यात हतोडा कींवा घनाचे घाव घालतोय व डोक्याची कवटी फुटतेय तसेच जबड्याचा सांधा निखळतोय असा भास होतो.


माइग्रेन लक्षणे- (Symptoms Of Migraine Headache in Marathi)


- मध्यम ते तीव्र स्वरुपाचे अर्धे डोके दुखणे किंवा पुर्ण डोके दुखणे,

- मळमळ व ऊलटी, घाम येणे

- चक्कर, घबराहट, कामात बिलकुल लक्ष न लागणे

- कानात विचित्र आवाज होणे

- दृष्टी धुसर होणे, कुठलाही तीव्र वास सहण न होणे

- प्रकाश सहण न होणे

- कुठलाही आवाज देखिल सहण न होणे