top of page
Search
  • Ayushman Bhava Ayurveda

Ayurvedic Treatment of Constipation/ मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठता


Ayurvedic Treatment of Constipation in Nashik

उत्तम आरोग्यासाठी व शरीरक्रिया सुस्थितीत चालण्यासाठी घेतलेला आहार हा रोजच्या रोज पचन होऊन मलस्वरुपात बाहेर पडणे गरजेचे असते. परंतु बर्‍याच कारणांमुळे मलत्याग रोजच्या रोज होत नाही किंवा मलप्रवृत्ती अधिक बद्ध स्वरुपात व कुंथुन करावी लागते या लक्षणांनाच मलावष्टंभ/ मलावरोध/ बद्धकोष्ठता किंवा constipation म्हटले जाते.

मलावष्टंभ हा स्वतंत्र आजार नाही परंतु बर्‍याच आजारांची पार्श्वभुमी तयार करण्यासाठी कारणीभुत ठरतो. यामुळे सुरुवातीला मलावष्टंभ हा जरी किरकोळ वाटत असला तरी जास्त काळ राहील्यास त्याची परीणती अनेक पचनाच्या किंवा इतर विकारांत होऊ शकते.

आयुर्वेदानुसार अपान वायु हा आतड्यांच्या सुयोग्य हालचाली घडवुन पचलेला आहार पुढे ढकलुन मलप्रवृत्ती होण्यास कारणीभुत असतो. परंतु खाली वर्णन केलेल्या कारणांमुळे अपाण वायु हा रुक्ष गुणाने प्रकुपित होऊन चल गुणाच्या कमतरतेमुळे आतड्यांच्या हालचाली योग्य होत नाहीत तसेच वाताच्या रुक्षत्वाने जलियांश शोषला जाउन मल शुष्क व पिच्छिल होतो असा मल आतड्यांना चिकटुन बसतो व मलप्रवृत्ती सकष्ट, अधिक बद्ध स्वरुपात व कुंथुन होते.

अशा प्रकारे योग्य मलप्रवृत्ती न झाल्याने कुंथुन मलप्रवृत्ती करावी लागणे, पोट जड वाटणे व फुगुन येणे अशी लक्षणे दिसायला लागतात. सोबतच गॅसेस, नाभी खालच्या पोटाच्या भागात जडपणा वाटणे, भुक मंदावणे, कुठल्याही कामात उत्साह नसणे, उदरशुल, चिड-चिडेपणा, डोके दुखणे, मळमळ-उलटी, अनिद्रा अशी अनेक लक्षणे मलावष्टंभामुळे शरीरावर दिसुन येतात. व खुप काळ मलावष्टंभ राहील्यास त्याची परीणती पुढे मुळव्याध, भगंदर, हर्निया, ग्रहनी (IBS), कोलायटीस, शिरशुल, जुनाट सर्दी अशा अनेक आजारांमधे होऊ शकते.Constipation ayurvedic treatment

मलावष्टंभाची कारणे- (Causes of Constipation)


अपाण वायुच्या विकृती साठी वातवर्धक अनेक घटक कारणीभुत असतात जसे,

- पचन्यास जड, थंड, शिळे व फरसाण, चिवडा यांसारखे कोरडया पदार्थांचा अहारात अतिवापर


- उपवास, अयोग्य वेळी आहार घेणे, भुक नसतांना जेवणे, जास्त प्रमाणात जेवणे


- मांसाहार, अंडे, मासे, हॉटेलचे किंवा बाहेरचे खाद्य पदार्थ, फास्ट फुड- जंक फुड, डबाबंद खाद्यपदार्थ या सर्वांचा अतिवापर


- बेकरीतील पदार्थ, अंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, मेदु वडा, ब्रेड, पाव, मैद्याचे पदार्थ


- रात्री जागरण, रात्री उशीरा जेवण करणे, दिवसा झोपणे, व्यायामाच अभाव, अपचन, अग्निमांद्य